Yashomati Thakur | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात रान पेटलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री व आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी रामदेव बाबा यांच्यावर सडकून टीका केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या , “रामदेव बाबा यांच वक्तव्य न शोभणारं आहे. भगवा परिधान करून खालच्या दर्जाच वक्तव्य अशोभनिय आहे. देशात व राज्यात खूप विषय आहे या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी व समाजाला विचलित करण्यासाठी हे विचीत्र वक्तव्य रामदेव बाबा करत आहे.”
“रामदेव बाबाला भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही”, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान , रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.
नेमकं घडलं काय?
ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणूनी थोबाड फोडा”; रामदेव बाबांच्या विधानावर अमोल मिटकरी आक्रमक
- Skin Care Tips | पार्लरमध्ये न जाता ग्लोइंग स्किन हवी असेल तर, करा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती फॉलो
- Health Tips | ब्रश न करता पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या!
- Vinayak Raut | “फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद”; विनायक राऊतांचा हल्लाबोल
- Rohit Sharma | रोहित शर्माच्या ऐवजी ‘हे’ खेळाडू बनू शकतात भारताचे कसोटी कर्णधार