‘पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही’

yashomati thakur

अमरावती- वाहनांसाठी रस्ता बंद आहे, असे समजवून सांगणाऱ्या आणि आपले कर्तव्य निभावणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांस सत्तेच्या मस्तीत मारहाण करणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.

पोलिसांवर हात उचलताना यशोमतीताईंवर कुठले संस्कार होते आणि तेव्हा संविधानाचे त्यांना स्मरण झाले नाही का, असा प्रश्नही शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे. अमरावती अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसाला मारल्याच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला आहे. 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी ठरवले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसकर्मी देखील शिक्षेस पात्र ठरवला आहे.

हा सामूहिक गुंडगिरीचा प्रकार आहे. पोलिसांवर हात उचलण्याचा आरोप सिद्ध झालेल्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा व आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून कर्तव्यदक्ष पोलीसास न्याय मिळाला आहे. सत्तेची नशा कशी असते, याचे व नशा कशी उतरते याचेही हे बोलके उदाहरण असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:-