बरं झालं स्वामी बोलले, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता – ठाकूर

modi

मुंबई – देशभरात सध्या पेगासस प्रकरण चर्चेत आहे. विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी साधत आहेत तर पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

यानंतर मोदींनी इस्रायली पंतप्रधानांना पत्र लिहून एनएसओच्या पेगॅसससाठी कोणाला पैसे दिले आहेत याविषयी सत्य शोधले पाहिजे. भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामीच हे बोलतायत म्हणून बरं, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता.असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावर एक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जागतिक स्तरावर भारताला अपमानित करण्याला काही वर्गांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याबाबत आम्ही सायंकाळी रिपोर्ट पाहिला आहे. विध्वंस करणाऱ्या कटाच्या माध्यमातून भारताचा विकास हा रुळावरून घसरणार नाही. पावसाळी अधिवेशन विकासाचा नवा मापदंड करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

IMP