ज्याची टेस्ट करा तो पॉझिटिव्ह येतो, ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली !

corona

पुद्दुचेरी : देशात कोरोनाचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीये. दरदिवशी मृत्यूचा आकडा नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. या व्हायरसने आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 348,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,55,338 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदींपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत सध्या १४ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुद्दुचेरीतल्या यनम जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट देशात सर्वाधिक आहे. इथे होणाऱ्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९६.९ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.

कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त असणं याचा अर्थ चाचण्या होत असलेल्या रुग्णांची अवस्था गंभीर असून ते आतापर्यंत समोर आलेले नाहीत असा होतो. आदर्श स्थितीत हा दर ५ टक्क्यांच्या खाली असायला हवा. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांखाली असल्यास याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आहे असा होतो. पुद्दुचेरीच्या यनम जिल्ह्यात हा रेट जवळपास १०० टक्के आहे. गेल्या आठवड्यात देशातील १७ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ४८ टक्क्यांच्या वर होता. यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रामीण भाग अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या