पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना हटवा! शिवसेना आमदाराची मागणी

औरंगाबाद: कचरा प्रश्नावरून औरंगाबाद महापालिका हद्दीतील मिट्मिटा गावात पोलिसांनी सामन्य नागरिकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत औरंगाबाद पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची बदली करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेत केली.

आंदोलनात सहभागी नसलेल्या नागरिकांनाही पोलिसांनी घरात घुसून महिला व पुरुषांना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. गावची लोकसंख्या १००० असली तरी १२०० नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले की पोलिसांनी दगडफेक केल्याचे फुटेज असून नागरिकांशी अमानवीय वागणूक झाली तरीही पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी मीटमिटा मध्ये जाण्याची तसदीही घेतली नाही. या सर्व प्रकरणात सरकारच्या वतीने निवेदन दिले जाईल असे मुख्यमंत्री बोलले आहेत.

धक्कादायक : गावकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून देखील दगडफेकीनेच उत्तर

पोलिसांनी गावात प्रवेश करून गावातील घरांवर दगडफेक केली, गल्लीबोळातील वाहनं फोडली, एवढंच काय ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. रात्रभर दिसेल त्याला पोलिसांनी गुराढोराप्रमाणे 1200 लोकांवर कारवाई केली.

You might also like
Comments
Loading...