भारतीय संघातील ‘या’ खेळाडूचं करिअर धोक्यात?

ipl

मुंबई : आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हा सामना पुढील महिन्यात 17 ऑक्टोबर रोजी युएयी मध्ये होणार आहे.

आयसीसीकडून आयोजित या मानाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समितीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ज्यामुळं त्यांचं नशीब फळफळलं आहे. पण, काही खेळाडूंचं स्वप्न मात्र तुटलं आहे. ज्यामध्ये कुलदीप यादवला संधी न दिल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.

भारतीय संघातून धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कुलदीपच्या करिअरला उतरती कळा लागली. T20 विश्वचषकासाठी कुलदीपची संघात निवड होऊ शकते अशी चर्चा होती मात्र, तसे झाले नाही. कुलदीप सातत्याने संधीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत कुलदीपच्या गोलंदाजीवरही परिणाम झाला.  कुलदीपला ‘चायनामेन गोलंदाज’ म्हणून ओळखल जातं. ही गोलंदाजीची अत्यंत वेगळी पद्धत आहे. ज्यामध्ये गोलंदाज बोटांच्या ऐवजी मनगटानं चेंडूला फिरकी देतो. गोलंदाजीमध्ये सातत्य नसल्यामुळे कुलदीपला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या