‘या’ फिरकीपटूने टाकला चक्क वेगवान बाउसंर; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतात आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगीत करण्यात आली. मात्र या दरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट सुरु आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन हा खेळत आहे. तो या स्पर्धेत ग्लेमोर्गन संघाचा सदस्य आहे. स्पर्धेत नुकत्याच पार पडलेल्या लॅकेशायर संघाविरुद्ध्याच सामन्यात तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेला मार्नस लॅबुशेन हा त्याच्या फलंदाजीसाठी खुप प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा फटकेबाजी करुन गोलंदाजीची पिसे काढली आहेत मात्र आता तो चर्चेत आला आहे त्याच्या गोलंदाजीमुळे. मार्नस हा फिरकीपटू आहे. मात्र फिरकीपटू असतानाही त्याने या सामन्यात तो गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर त्याने धाव घेतली. हा चेंडु त्याने वेगवान गोलंदाजाप्रमाणे फलंदाज ल्युक वुडला बाऊन्सर चेंडू टाकला.

 

त्याचा हा बाउसंरमुळे फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले होते. फलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू गेला होता. मात्र यष्टीरक्षक क्रिस कूकने चपळता दाखवत चेंडू धरला होता. या बाउंसरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. २०१९ साली टी१०लीग मध्ये आंद्रे रसलला अफगाणिस्तान संघाच्या एका फिरकी गोलंदाजाने बाऊन्सर चेंडू टाकला होता. तो रसलच्या सरळ तोंडाला लागता लागता होता. दुर्दैव असे की रसेलने त्यावेळी हेल्मेट देखील घातले नव्हते.

महत्वाच्या बातम्या

IMP