भारतीय संघात ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात ; द्रविड-धवन घेऊ शकतात निर्णय

dravid

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत अगदी सहज पार केले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७व्या षटकात ३ गडी गमावत हे अव्हान सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली.

श्रीलंकेने ठेवलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शिखर धवन 95 बॉलमध्ये 86 रनवर नाबाद राहिला. इशान किशनने  42 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. सूर्यकुमार यादवने 20 बॉलमध्ये 31 रनची नाबाद खेळी केली. पृथ्वी शॉ 43 रनवर तर मनिष पांडे 26 रनवर आऊट झाला.

आता या मालिकेतील दुसरी मॅच मंगळवारी आहे. मंगळवारीच ही मालिका जिंकण्याचा दृष्टीने टीम इंडिया मैदानात उतरेल. एकदिवशीय सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने विजय मिळवला असला तरीदेखील टीममध्ये एका खेळाडूची जागा धोक्यात आली आहे. पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या मनिष पांडेच्याजागी देवदत्त पडिक्कलचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP