Share

“शेत खाणाऱ्या कुंपणापासून बचावासाठी वाय दर्जाची सुरक्षा…”, भातखळकरांचा शिवसेनेला टोला

मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण रंगले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी -शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी? असे म्हटले. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर (sanjay raut) टीका केली आहे.

“सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर आली आहे” अशी वायफळ टीका शिवसेनेने केली आहे. कळव्याच्या खाडीत मनसुखचे तरंगणारे प्रेतं सापडल्यानंतर मोदी सरकार सजग झाले आहे. शेत खाणाऱ्या कुंपणापासून बचावासाठी वाय दर्जाची सुरक्षा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

देशातील वातावरण मोकळे व सुरक्षित राहिलेले नाही. केंद्र सरकारने ऊठसूट ‘वाय’ किंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे मोदी-शहांच्या काळात मोकळेपणाने जगण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांना उगाच भय वाटते. हे भय टोकाचे आहे. मात्र भाजपपुरस्कृत भयग्रस्तांना केंद्र सरकार खास सुरक्षा व्यवस्था पुरवीत आहे. असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण रंगले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Mumbai Politics