ग्राहकांसाठी Xiaomi चा धमाकेदार सेल

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय बाजारात 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिनी कंपनी Xiaomi आपली ‘अॅनिवर्सरी’ साजरी करते आहे. त्यानिमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी 4th Mi Anniversary Sale या खास सेलचं आयोजन केलं असून 10 जुलै ते 12 जुलै दरम्यान हा सेल असणार आहे. दरम्यान या सेलमध्ये अनेक धमाकेदार ऑफर आणि मोठ्या प्रमाणात सूट कंपनीकडून देण्यात आली असून विशेष म्हणजे या सेलमध्ये अवघ्या 4 रुपयांत काही प्रोडक्ट खरेदी करण्याची ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे.

सेलमध्ये ग्राहक अवघ्या 4 रुपयांमध्ये एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 (55 इंच), रेडमी वाय 1, रेडमी वाय 2, रेडमी नोट 5 प्रो आणि एमआय बॅंड 2 या वस्तू खरेदी करु शकतात असं कंपनीकडून सांगण्यात आलयं. याशिवाय Xiaomi Mi Mix 2 आणि Xiaomi Mi Max 2 यांसारखे फोन कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, 4 रुपयांमध्ये किती डिव्हाइसची विक्री केली जाईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 10 ते 12 जुलैदरम्यान रोज दुपारी 4 वाजता हा सेल सुरू होईल.

कंपनीने काही कॉम्बो ऑफऱ देखील आणल्या असून यामध्ये Mi Body Composition Scale + Mi Band 2 केवळ 1 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय 9 हजार 999 रुपयांमध्ये Redmi Note 5 + Mi VR play 2 खरेदी करता येईल. तर Redmi Y1 + Mi Bluetooth Headset 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कॉम्बो ऑफरअंतर्गत या सर्व प्रोडक्ट्सच्या केवळ 200 युनिट्सची विक्री केली जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. याशिवाय या सेलमध्ये कंपनीकडून इतर अनेक प्रोडक्टवर मोठी सूट दिली जात असून, याबाबत कंपनीच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

 

शाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट

अखेर वन प्लस फाइव्ह भारतामध्ये लाँच पहा काय आहेत फिचर