टीम महाराष्ट्र देशा: मोबाईल (Mobile) उत्पादक कंपनी Xiaomi नेहमी आपल्या ग्राहकांसाठी आपल्या कंपनीचे बेस्ट मॉडेल सादर करत असते. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा अधिक फोन ऑफर करत आहे. Xiaomi लवकरच नवीन स्मार्टफोन सिरीज बाजारात लाँच करणार आहे. Xiaomi 13 आणि MIUI 14 ची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण कंपनीने या सिरीजच्या लाँच ची तारीख जाहीर केली आहे. कंपनी Xiaomi 13 आणि MIUI 14 1 डिसेंबर 2022 रोजी लॉंच करणार आहे. Xiaomi चे सीईओ Lei Jun यांनी ही माहिती शेअर केली आहे. Xiaomi चे हे नवीन मॉडेल खूप आरामदायी आणि खूप आकर्षक असणार आहेत.
Xiaomi 13 फीचर्स
Xiaomi 13 या सिरीज मध्ये कंपनीने अनेक खास वैशिष्ट्ये दिले आहेत. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत RAM आणि 228 पर्यंत इंटरनल स्टोरेज असू शकते. या फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले, तर या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असू शकतो. त्याचबरोबर यामध्ये 13 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4,5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.
Xiaomi 13 हा फोन अनेक विशेष वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच होऊ शकतो. त्याचबरोबर हा फोन पाण्यात पडला तरी खराब होणार नाही. कारण वॉटर रेसिडेंट असणाऱ्या या मालिकेच्या सर्व मॉडेल्समध्ये IP68 सर्टिफिकेशन उपलब्ध असतील. हा फोन अर्धा तास एक मीटर पाण्याखाली राहू शकतो असा कंपनीने दावा केला आहे.
Xiaomi 13 या नवीन सिरीज मॉडेलच्या किमतीबद्दल अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर हे मॉडेल्स कोणत्या प्रोसेसरसह बाजारात उपलब्ध होतील याबद्दलही कुठली माहिती मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “आता पुन्हा आसामला जाऊन नवस करणार का?”; सीमावादावरून संजय राऊतांचा शिंदे सरकारला सवाल
- Sanjay Raut | “महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय…”; संजय राऊत यांचं मोठं विधान
- Kiwi Fruit | हिवाळ्यामध्ये किवी खाऊन रहा ‘या’ आरोग्याच्या समस्यांपासून दूर
- Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
- Kriti Sanon | कृती आणि प्रभास करताय एकमेकांना डेट?, वरुण धवनने केला खुलासा