Rohit Sharma- रोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार

rohit sharma

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने डब्लूडब्लूईचा खेळाडू आणि सीओओ ट्रिपल एचचे आभार मानले आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियन्स संघासाठी खास गिफ्ट पाठवल्यानंतर रोहितने त्याचे आभार मानले आहे.
यावर्षी मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा विजेता ठरला. त्यानंतर २-३ दिवसांनी ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला एक खास गिफ्ट पाठवणार असल्याचं ट्विट केलं होत. दिलेल्या शब्दाप्रमाणे ट्रिपल एचने चॅम्पिअन्सचा बेल्ट मुंबई इंडियन्स संघासाठी पाठवला.

त्याबरोबर एक ट्विटसुद्धा केले. त्यात ट्रिपल एच म्हणतो, ” मी दिलेल्या शब्दाप्रमाणे डब्लूडब्लूइ टायटल मुंबई संघाला देत आहे. अभिनंदन. ”

रोहीतनेही ट्रिपल एचचे मानले आहे. रोहित आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” माझा यावर विश्वास बसत नाही की मी डब्लूडब्लूइ चॅम्पिअनशिपचा बेल्ट हातात घेतला आहे जो की स्वतः चॅम्पियनने पाठवला आहे. धन्यवाद. ”

रोहितने या बेल्ट बरोबर छायाचित्र घेताना खास मुंबई इंडियन्सचा टीशर्ट सुद्धा घातला आहे.