डब्ल्युटीसी फायनल! ‘इंग्लंडमध्ये यापुढे महत्वाचे सामने नकोच’, पिटरसनने व्यक्त केला संताप

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्याा चौथ्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ पुन्हा वाया गेला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २ गडी गमावत १०१ धावांची मजल मारली होती.

डब्ल्युटीसी सामन्यात येणाऱ्या पावसाच्या सततच्या व्यत्ययाला आयसीसीला जबाबदार असल्याचे म्हणले जात आहे. यात आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु केवीन पीटरसनने यापुढे आयसीसीचे महत्वाचे सामने हे इंग्लंडमध्ये नकोच अशी मागणी केली आहे. त्याने ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तो म्हणाला की,’मला खुप वाईट वाटत आहे सांगताना पण क्रिकेटचा महत्वाचा सामना यापुढे इंग्लंडमध्ये खेळवायला नकोच’ असे ट्विट केले. यानंतर काही वेळाने त्याने दुसरे ट्विट करत महत्वाच्या सामन्यासाठी दुबईचा पर्याय सुचवला.

दुबई विषयी केलेल्या ट्विटमध्ये पीटरसन म्हणाला की,’जर माझ मत सांगायच झाल तर, डब्ल्युटीसी सारख्या महत्वाच्या सामन्यासाठी दुबई हे ठिकाण योग्य राहील. दुबई हे तटस्थ ठिकाण, शानदार मैदान आणि चांगल्या हवामानाची खात्री, यासह सराव करण्यासाठी उच्च दर्जाची सुविधा आणि प्रवासासाठी उत्तम अरे हो आयसीसीचे मुख्यलयाच्या अगदी बाजुला’ असे ट्विट केले आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येणाऱ्या पावसामुळे अनेक क्रिकेट रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या