बालभारती चा अजब कारभार

पुणे : नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या नववीच्या पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकवण्यात आल्या असून गुजरात राज्याचा बहुतांश भूभाग हा पाकिस्तानात दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नववीच्या पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील अशीच चूक मंडळाकडून करण्यात आली होती गेल्या वर्षी दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चुकीचे नकाशे छापले होते. या नकाशात अरुणाचल प्रदेश चीनमध्ये, अंदमान, निकोबार बेटे नकाशातून गायब ,कच्छचे रण पाकिस्तानात दाखविण्यात आले होते
या वर्षीच्या चुकीच्या नकाशांची सर्व्हे ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली असून हे नकाशे ताबडतोब बदला, अशी नोटीस राज्य शिक्षण मंडळाला पाठविली आहे. मागीलवेळी दहावीच्या नगर येथील शिक्षणतज्ञ नरेंद्र तांबोळी यांनी या चुकीच्या नकाशांबाबत सर्व्हे ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती.

नकाशांमधील चुकांना बालभारती जबाबदार:म्हमाणे

भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील या चुकीच्या नकाशांविषयी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी या चुकीच्या नकाशांची जबाबदारी बालभारतीची असल्याचे सांगितले. सर्व्हे ऑफ इंडियाने शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या नावाने नोटीस जरी पाठविली असली तरी पाठ्यपुस्तकांची छपाई बालभारती करते, असे म्हमाणे यांनी स्पष्ट केले.