लेखक शब्दांसोबत खेळत नाहीत – डॉ. माधवी वैद्य

madavi vaidya

टीम महाराष्ट्र देशा- लेखकाच्या मनात श्वासासोबत शब्दांचा रियाज दिवसरात्र सुरू असला पाहिजे. शब्दांसोबत खेळणे गरजेचे आहे. ग.दि.माडगूळकरांना शब्द सरीप्रमाणे सूचत होते. कारण त्यांची शब्दांसोबत बांधिलकी होती. नृत्य करणारा नृत्याचा रियाज करतो, चित्र काढणारा रंगांमध्ये खेळतो, फक्त आपले लेखक मात्र शब्दांसोबत खेळत नाहीत. अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केली.विष्णूजी की रसोई पुणे आणि सिद्धीविनायक पब्लिसिटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कवयित्री सना पंडित यांच्या “चित्रधून “या चित्रकाव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य आणि कला मर्मज्ञ व संग्रहक डॉ. तरिता शंकर यांच्या हस्ते शनिवारी झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते व संत साहित्याचे व्यासंगी उल्हासदादा पवार यांनी भूषवले होते. याप्रसंगी भारत सासणे, कवयित्री सना पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचा सत्कार करण्यात आला. या अनोख्या प्रदर्शनाचा आस्वाद सोमवारपर्यंत (दि. ६) विष्णूजी की रसोई, वकील नगर, एरंडवणे येथे सर्व साहित्य रसिकांना घेता येणार आहे.डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या की, सध्याचा काळ हा व्हिज्वल भाषेचा आहे. मात्र, आताचे लेखक टी.व्ही ला अनुसरून व्यवस्थित लिखाण करत नाहीत. लेखकांना व्हिज्वल भाषेची ताकद समजली नाही.

चित्र आणि शब्दांची सांगड घालणे खूप कठीण असते मात्र हे धनुष्यबाण सगळ्यांनाच पेलता येत नाही. लेखकांनी वेगवेगळी माध्यम ओळखली पाहिजे. चांगला लेखक उत्तम पद्धतीने टीव्हीसाठी संहिता लिहू शकेलच असे नाही. नेमकं पडद्यावर काय मांडायचं हे लेखकाला उपजत नाही तोपर्यंत लेखकाला व्हिज्वल संहिता लिहिता येऊ शकत नाही. काळ बदलत चालला आहे.

त्याप्रमाणे अभिव्यक्त होण्याची परिमाण देखील बदलत चालली आहेत. व्यक्त होण्यासाठी कोणी नाटक लिहितं कोणी कविता लिहितं तर कोणी पुस्तक लिहितं. याप्रमाणे अभिव्यक्त होण्यासाठी शब्द चित्रकाव्य हे नवीन परिमाण येऊ घातलं आहे. या काव्य चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने शब्द आणि चित्राची सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. अध्यक्षस्थानावरून उल्हासदादा पवार म्हणाले की, स्वराला पर्यायी शब्द असू शकतो मात्र धूनची जादू निराळी आहे. कारण डोळे बंद केल्यावर चित्र आणि धून या दोन्ही गोष्टी एकसाथ अनुभवता येतात. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने विविध मार्गातून व्यक्त होत असतो पण काव्य आणि चित्राच्या माध्यमातून व्यक्त होण्याची कला अद्भुत आहे. मोजक्या लोकांना ही कला जमते त्यातील कवयित्री सना पंडित एक असल्याचे पवार यांनी सांगितले.Loading…
Loading...