टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार करत काही ठिकाणी बंधनं शिथिल करण्या संबंधीचे निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
देशभरातील मद्यप्रेमींच्या आणि राज्य सरकारांच्या महसूलाच्या दृष्टीने महत्वाची असलेली दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु आज दारूची दुकानं उघडणार म्हणून मद्यप्रेमिंनी दारू दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. मद्यप्रेमींना यावेळी सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला.
क्षितिज पटवर्धन यांची फेसबुक पोस्ट-
आता मराठी कथा, पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन यांनी सोशल मीडियावर याबाबत त्याचं मत कठोर शब्दांत मांडलंय. ते फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, ‘व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर!!’
दरम्यान, अनेकांनी दारूची दुकानं सुरू होण्यापूर्वीच सकाळी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केली. मात्र हळूहळू रांग वाढत गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
हेही पहा –