fbpx

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. गंगाधर पानतावणेंचे दुःखद निधन

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘अस्मितादर्श’कार डाॅ. गंगाधर पानतावणे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई असा परिवार आहे. नुकताच केंद्र शासनाने त्यांना ‘पद्म’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
दोन महिन्यांपूर्वी घरात पडले होते. तेव्हापासुन आजारी होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे पु. लं. देशपांडे आणि कुसुमाग्रज यांच्याशी घरगुती संबंध होते. अस्मितादर्श ही दलित साहित्य चळवळ त्यांनी चालविली. त्यातून अनेक मान्यवर लेखक-कवी त्यांनी घडविले.
डाॅ. पानतावणेंचा जन्म 28 जून 1937 ला नागपूरमध्ये झाला. ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आले होते. ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते.

त्यांचे ग्रंथ : मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मूकनायक (डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र), दलित प्रबोधन, वादळाचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाड़मय, लेणी

साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य : शोध आणि संवाद, स्मतिशेष.
संपादित ग्रंथ : दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकचळवळीचे प्रणेते : म. जोतिबा फुले, महारांचा सांस्कृतिक इतिहास, लोकरंग, स्त्री आत्मकथा, धर्मचर्चा, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख.
ग्रंथ पुरस्कार: महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार (साहित्य : प्रकृती  आणि प्रवृत्ती ), महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, पुरस्कार ( दलित साहित्य: चर्चा आणि चिंतन ),