fbpx

सरकारी लाभासाठी साहित्यिक लिखाण करतात – हेगडे

Anant-Kumar hegade

टीम महाराष्ट्र देशा- बुद्धिजीवी आणि साहित्यिक हे केवळ सरकार लाभ मिळवण्यासाठी आपले काम आणि कलांचे प्रदर्शन करतात, असे वक्तव्य करून कर्नाटकमध्ये खळबळ उडवून दिली आहे. संविधान बदलण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर संसदेत माफी मागून एक महिना पूर्ण होण्याआधीच केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बेळगावी येथे ‘स्किल्स ऑन व्हिल्स’ या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले हेगडे ?

साहित्यिक जे काही लिहितात ते साहित्य बनते. त्यांच्या लेखनाला कोणतीही प्रासंगिकता किंवा अर्थ नसतो. फक्त सरकारी जमीन घेण्यासाठी ते असे करतात. हे तथाकथित बुद्धिजीवी मला मनुष्य होण्यास सांगतात. मी काय जनावर आहे का ? मनुष्य जन्मानंतर आपले पुढील लक्ष्य हे देवतांसारखे होण्याचा असला पाहिजे. या सर्वांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांनी अशी टिप्पणी करणे बंद केले पाहिजे, असे हेगडे म्हणाले.

हा तर अटलजींचा अपमान ,लाज मोदींना वाटली पाहिजे -सबनीस
दरम्यान या वक्तव्याचा जेष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी समाचार घेतला . अटल बिहारी वाजपेयी सुद्धा साहित्यिक होते त्यामुळे हेगडे यांनी त्यांचा सुद्धा अपमान केला आहे. अटल बिहारींनी जमिनीसाठी अथवा जागेसाठी लिहिलं असं म्हणावं का ?अशी माकड चेष्टा करणारी मंडळी दुर्दैवाने सत्तेमध्ये सामील झाली याची लाज मोदींना वाटली पाहिजे आणि मोदींनी त्यांचे कान उपटायला पाहिजेत अशा हेगडे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली .

साहित्य आणि साहित्यिक यांचा तसूभरही संबंध आणि संदर्भ ज्यांना कळत नाही ते अशी वक्तव्ये करीत असतात.केवळ जमिनीच्या लाभासाठी साहित्यिक साहित्य लिहित असतो असं म्हणणे म्हणजे ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज,खांडेकर, करंदीकर,नेमाडे,अशा माणसांच्या विद्वत्तेबद्दल आणि साहित्य निष्ठेबद्दल शंका निर्माण करणारे पाप या हेगडे नावाच्या नालायक व्यक्तीचं आहे.सत्तेच्या साठ्मारीमध्ये हेगडे सारखी माणसे सामील होतात.त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना जे दिसतं,ते तसच सगळ्यांबद्दल बोलत असतात,मानवी कल्याणाच्या दृष्टीने साहित्य लिहणारे साहित्यिक यांच्या पायाच्या धुळीचीही बरोबरी अशा नालायक माणसाना येऊ शकत नाही.अशा माणसांबद्दल कॉमेंट करणे सुद्धा लाजिरवाणे आहे.अटल बिहारी सुद्धा साहित्यिक होते त्यामुळे हेगडे यांनी त्यांचा सुद्धा अपमान केला आहे. अटल बिहारींनी जमिनीसाठी अथवा जागेसाठी लिहिलं असं म्हणावं का ?त्यामुळे अशी माकड चेष्टा करणारी मंडळी दुर्दैवाने सत्तेमध्ये सामील झाली याची लाज मोदींना वाटली पाहिजे आणि मोदींनी त्यांचे कान उपटायला पाहिजेत . श्रीपाल सबनीस (जेष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष )