कुस्तीपटु बजरंग पुनीयाची उपांत्यपुर्व फेरीत धडक, पदकाची आशा वाढली

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतुन भारतीयासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत भारताचा कुस्तीपटु बजरंग पुनीयाने उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली आहे. कझाकिस्तानचा कुस्तीपटू अरनाजरला पराभुत करत बजरंगने हा विजय मिळवला आहे.

शुक्रवारी ऑलिम्पिक स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीचे सामने रंगले. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनीयाने कझाकिस्तानच्या अरनाजर अकमातालीला पराभुत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पहिल्या ३० सेंकदात दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने कुणालाही गुण मिळाले नाही. यानंतर पहिल्या सत्रात बजरंगने ३-१ अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सत्रात अरनाजरने पुनरागमन करत ३-३ अशी बरोबरी केली.

पहिल्या सत्रात मिळवलेल्या आघाडीमुळे बजरंग पुनीयाला या सामन्यात विजयी घोषीत करण्यात आले. पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या बजरंग पुनीयाला पदक पटकावण्यासाठी त्याला २ विजय अवश्यक आहे. यापुर्वी त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या