कुस्तीपटू बबिता फोगटला पुत्ररत्नाचा लाभ

babita phogat

मुंबई : भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगटला 11 जानेवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. बबिताने पती विवेक सुहाग याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

“आमच्या मुलाला भेटा, स्वप्नांवर विश्वास ठेवा, ते पूर्ण होतात. आमचं पूर्ण झालंय, निळ्या कपड्यांमध्ये पाहा,” अशी पोस्ट बबीता फोगटने शेअर केली आहे. बबीता फोगटने तिच्या मुलाचा फोटोही शेअर केला आहे.

बबीता फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. तिच्या या कामगिरीनंतर हरियाणा सरकारने तिला उपनिरीक्षकाची नोकरी दिली होती. मात्र त्यानंतर तिनेही नोकरी सोडली. बबीता फोगट राजकारणात सक्रीय आहे. 2019 च्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र तिचा पराभव झाला. सध्या ती हरियाणा महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आहे.

दरम्यान, त्याचदिवशी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या