वर्तमान पत्रात बांधलेले पदार्थ जर खात असाल तर सावधान ……

वेबटीम-कोणताही पदार्थ  किवां भाजीपाला बांधून द्यायचा असेल तर चटकन वर्तमान पत्र हातात घेतले जाते.पण वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ आरोग्यास घातक ठरू शकतात.एका संशोधनातून हे समोर आले आहे.

स्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे जसे धोक्याचे आहे, त्याहीपेक्षा वर्तमानपत्रावर खाणे जास्त धोक्याचे असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. बरेचजण आज वडापाव, समोसा, कचोरी आदी पदार्थांसह घरातीलही खाद्यपदार्थ वर्तमानपत्रावर खाताना दिसतात. मात्र असे करणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देणे होय. वर्तमानपत्रात तेलकट पदार्थ ठेवल्याने त्यातील रसायने खाण्यात उतरतात. देशाच्या खाद्य सुरक्षा नियामक एफएसएसएआईने खाण्याचे पदार्थ कोणत्याही कागदात ठेवण्यासाठी प्रतिबंध केला आहे. त्यांनी सांगितले आहे, की असे केल्याने तुमच्या शरिरात कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानद प्राधिकारने (एफएसएसएआई) याविषयी काही निष्कर्श मांडले आहे, खाण्याचे पदार्थ वर्तमानपत्रात गुडाळणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा एफएसएसएआईला म्हणाले की यासाठी लोकांचे प्रबोधन करा. कारण वर्तमानपत्र छापताना वेगवेगळी रसायनांचा त्यात वापर होतो, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.