सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल

supriya sule 1

टीम महाराष्ट्र देशा : वर्ध्यासोबत माझी नाळ जुळली आहे. बारामतीनंतर मला इतर कुठे लढायची संधी मिळाली तर मी वर्ध्यावरुन खासदारकी लढेन, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. मुख्यध्यापकांच्या ५९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ” माझी राजकारणात आणि समाजकारणात जी काही ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मी हे बोललेलं कदाचित बारामतीकरांना आवडणार नाही, पण जर कधी बारामतीमधून दुसरा खासदार उभा राहिला तर मला आवडणारा जिल्हा आणि मतदारसंघ वर्धा आहे,’ असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. तसेच वर्ध्याला आले की मी आवर्जून पवनारच्या परमधाम आश्रमात जाते. तिथे मनाला शांती मिळते असेही त्या म्हणाल्या.

यावेळी खासदार तडस यांच्याकडे पाहत आपण चिंता करू नका, सध्या तसा काही विचार नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. मात्र त्यांच्या या खुलाशाने सभागृहात हशा पिकला.त्यानंतर त्या म्हणाल्या, मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या सारातून राज्यालाच नव्हे, तर देशाला दिशा देण्याचे काम करता येईल. तो सर्व मला किंवा खासदार तडस यांना पाठवला, तर मी संसदेत प्रश्न मांडण्याचे काम निश्तच करेन. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तसेच जुनी पेन्शन योजना, शालेय पोषण आहार, बदलीचा प्रश्न शाळेचे अनुदान या विषयांवर जयंत पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणीन, असे आश्वासन खासदार सुळे यांनी काल येथे दिले.

महत्त्वाच्या बातम्या :