…तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते- हार्दिक पटेल

hardik patel

मुंबई: गुजरात निवडणुकीपूर्वी मी राहुल गांधीची भेट घ्यायला पहिजे होती. जर ती भेट झाली असती, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते. तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असते, असे पाटीदार नेता हार्दिक पटेल याने स्पष्ट केले. तो इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होता.

हार्दिक पटेल म्हणाला, जर मी ममता बँनर्जी, नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीरपणे भेटू शकतो. तर राहुल गांधीची भेट घेण्यात मला काहीही अडचण नव्हती. पण  मी ती भेट टाळली. राहुल गांधींची भेट टाळणं ही सर्वात मोठी चूक होती. तसेच जर ती भेट झाली असती तर भाजपला ९९ ऐवजी ७९ जागांवरच समाधान मानावे लागले असते.

Loading...

मोदींवर टीका करत हार्दिक पटेल म्हणाला, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींचं नाव जाहीर केले, त्यावेळी आम्हाला वाटलं की, या देशातील तरुणांना रोजगार मिळेल. या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हामीभाव मिळेल. पण त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले