चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ६१७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ कोरोना बाधित

corona

पुणे : देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ६१७, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर दिवसभरात पुण्यात पाच तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या आकडेवारीबरोबर पुण्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १६ हजार ७४१ वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज अखेर ६१८ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्या ४८२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९ हजार ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १९९ कोरोना बाधित रुग्ण आढळले यांपैकी १२ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर आज उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांचा आकडा २ हजार ९०९ वर पोहचला आहे. यांपैकी १,८८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आज प्रथमच मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

पुण्यात कोरोनाचे थैमान, राष्ट्रवादीच्या धडाडीच्या महिला नेत्या अडकल्या विळख्यात

मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’