fbpx

भारताच्या कुटनीतीचा विजय ; डोकलाम मधुन दोन्ही देश घेणार सैन्य मागे

वेबटीम : डोकलाममधला तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याची चर्चा सुरु असताना आता डोकलाम परिसरातून दोन्ही देश आपलं सैन्य मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

नुकतेच भारतीय सैन्यानं डोकलाम परिसरातल्या गावकऱ्यांना, गाव खाली करण्याचे आदेश दिले होते.डोकलामपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथनांगमधल्या जवळजवळ 100 गावकऱ्यांना गाव खाली करण्यास सांगण्यात आलं होत .डोकलामच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधला तणाव प्रचंड वाढला होता .

डोकलाम प्रकरणी भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक स्तरावर सातत्याने चर्चा सुरु आहे. या चर्चेतून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्या सोबतच सैन्याची जमवाजमव देखील केल्याच्या बातम्या येत होत्या . मात्र आता चीन आणि भारत दोन्ही देश डोकलाम मधून सैन्य हटवण्याच्या मुद्द्यावर तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .