fbpx

जागतिक महिला दिन: लढा स्त्री मुक्तीचा

womans day 8 march

आधुनिक जगात महिला सक्षमीकरणाच्या गप्पा होत असल्या तरी खरच आज महिला सक्षम झाली आहे का? स्त्री-पुरुष समानता हा विचार समाजात रुजायला आणखी किती दिवस लागतील? हे देखील सांगता येणार नाही. तिच्या अर्ध्या आभाळातील श्रध्देचा विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा.

जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो. महिलांविषयी वृत्तपत्रांचे रकाने भरून येतात, यशस्वी महिलांचे कौतुक केले जाते. जागतिक महिला दिन हा महिलांनी त्यांच्या अधिकारासाठी केलेला संघर्ष आणि दिलेल्या लढ्याचा ऎतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपले आयुष्य क्षणोक्षणी समाजाच्या विकासासाठी झोकून दिलं आहे. त्यांचं स्मरण करून त्यांच्या पायवाटी चालणे आपले कर्तव्य आहे.

womens-day

जगभरातील सर्व महिला व मुली यांच्यासाठी या दिवसाचे काय महत्त्व आहे हे जाणून घ्यायला हवे .कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांनी मतदानाचा हक्क व समान वागणूक या मागणी पासून सुरू केलेला एक लढा स्त्री मुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे लावला गेला.

स्त्रीमुक्तीचा शारिरीक व मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहचवण्याची व जागरूकता निर्माण करण्याची गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात ‘क्लारा झेटकीन्स ’ या जर्मनीतील कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्या दिवशी जगभरातील महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करू शकतील.

world women day

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या एतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकार करावा, असा ठराव क्लारा हिने मांडला व तो पास ही झाला. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ ला साजरा झाला. १९७१ च्या ८ मार्चला पुण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला. पुढे १९७५ हे साल यूनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या समोर यायला लागल्या, त्या बोलत्या व्ह्यायला लागल्या. स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली ती राजा राममोहन रॉय, महात्मा फुले अनेक असंख्य नावांनी.

स्त्रीवादी चळवळ अनेक अडचणीना सामोरी गेली आणि आज तिने स्वतःला नवीन ओळख व दिशा दिली आहे. आज महिलांचा विकास झाला आहे पण सर्वा्ंगीण नाही समाजाचा काही वर्ग खूप पुढे गेला आहे आणि एक वर्ग खूप मागे आहे. अजूनही खूप स्त्रिया अशिक्षित , हुंडाबळी, अंधश्रद्धा अशा अनेक बंधनात अडकल्या आहेत. त्यांचा दिवस कोंबडा बाग देण्याआधीच सुरू होतो व किरकिर वर रात्र संपते या आरशाची एक बाजू खूपच सुंदर व दुसरी तितकीच कुरूप.

women village

समाज आजही आपल्या परंपरागत मानसिकतेतून बाहेर येण्यास तयार नाही. विषमता निर्माण करणाऱ्या रुढी परंपरांचे मूळ उखडून टाकायला हवे. संत ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री पुरुषन्नम भेदे!! शिवपण एकले नांदे!! म्हणजे शिव शक्ती चे स्वरूप वरून जरी दोन असले तरी त्यांचे तत्त्व एक आहे. स्त्री पुरुष समानता यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही अर्थात हा विचार समाजात रुजायला आणखी किती दिवस लागतील हे देखील सांगता येणार नाही. तिच्या अर्ध्या आभाळातील श्रध्देचा विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा.

womans day 8 march
मयुरी विजया रामदास वाशिंबे