fbpx

आज आहे आपल्या लाडक्या ईमोजीचा वाढदिवस…

world emoji day news marathi

विरेश आंधळकर : 17 जुलै म्हणजेच आज भारतामध्ये देशाचे सर्वौच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदासाठी मतदान केले जात आहे . यामुळे १७ जुलै ह्या तारखेला भारतामध्ये महत्व प्राप्त झाल आहे. पण तुम्हाला माहित आहे का कि जगात दरवर्षी १७ जुलै ती तारीख काय म्हणून साजरी केली जाते? माहित नसेल तर आम्ही सांगतो ना. आज जगभरात साजरा केला जातोय तो “ वर्ल्ड ईमोजी डे’.

world emoji day 17 juali marathi news

 ‘ईमोजी’ आपल्या दररोजच्या सोशल लाईफमधला एक महत्वाचा घटक. सोशल मिडिया वापरात असताना आपण आज शब्दातून व्यक्त केल्या न जाणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी ईमोजीचा दिवसभरात शेकडोवेळा वापर करतो . त्यामध्ये मग हसरी स्माईली . पुढे खदखदून हसणारी , रडणारी ईमोजी आणि वेगवेगळ्या प्रकरच्या २ हजार ६६६  प्रकारच्या ईमोजी जगभरात वापरल्या जातात .  

types of emoji world emoji day 17 juali marathi news

 १९९० च्या जवळपास ईमोजी अस्तित्वात आल्या आहेत. २०११ मध्ये पहिल्यांदा ऍपलने आपल्या आयफोन की बोर्डमध्ये ते ईमोजीचा समावेश केला होता. १७ जुलै २०१४ ला पहिला वर्ल्ड ईमोजी डे साजरा करण्यात आला. सीएनबीसीच्या म्हणण्यानुसार ‘इमोजीपीडया’चा संस्थापक असणारा जेरेमी बर्ज याने पहिल्यांदा २०१४ मध्ये जागतिक इमोजी डे साजरा करण्याची कल्पना मांडली आणि तेथून १७ जुलै हा दिवस जागतिक इमोजी डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली  

types of emoji world emoji day 17 juali marathi news

जागतिक इमोजी डे साजरा करण्याचा हेतू हा डिजिटल युगातील भावना वक्त करणाऱ्या इमोजी वापरणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि ईमोजीचा प्रचार आणि  प्रसार करणे हा आहे.

fb top emoji

 एका सर्वेनुसार फेसबुकवर वर सर्वाधिक वापरली जाणारी  इमोजी हि  ‘हसताना डोळ्यातून पाणी आलेला चेहरा’ हि आहे. 

world emoji day news marathi

फेसबुक मेसेंजरवर दररोज पाच कोटीहून अधिक इमोजी पाठविली जातात