अंडी खा स्वस्थ रहा.

international egg day

अहमदनगर, १३ ऑक्टोबर, : शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पो मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने,जीवनसत्वे,ऊर्जा,खनिजे,स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात.लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच अंडी हा उच्च पोषणमूल्य देणारा,सहज उपलब्ध होणारा स्वस्त व समतोल आहार आहे.प्रत्येकाने याचे नियमित सेवन करायला हवे,असे प्रतिपादन राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.अजयनाथ थोरे यांनी केले.जागतिक अंडी दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाभरात १ लाख उकडलेल्या अंड्यांचे मोफत वितरण करण्यात आले.नगरमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करताना डॉ.थोरे बोलत होते.या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त डॉ.अनिल बोठे, डॉ.अशोक ठवाळ,डॉ.राजेंद्र जाधव,डॉ.वृषाली भिसे,शर्वरी पंधाडे,डॉ.विनोद गोतारणे,राहुल कांबळे,विजय टोरपे,डॉ.कुलदीप चौरे, राजकुमार चव्हाण,पंढरीनाथ चव्हाण,दिनेश शिंदे,अजय गुगळे,डॉ. बाबासाहेब कडूस आदी उपस्थित होते. अंडी दिनानिमित्त विविध बालगृह, आश्रमशाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांनाही उकडलेल्या अंड्याचे मोफत वाटप करण्यात आले.डॉ.थोरे पुढे म्हणाले की,दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुस-या शुक्रवारी जागतिक अंडी दिनानिमित्त अंडी सेवनाबाबत जनजागृती करण्यात येते.जिल्ह्यात ४ वर्षांपासून पशुसंवर्धन विभाग लोकसहभागातून अंडी वितरण करत असतो.अंडी सेवनाचा आरोग्याला तर फायदा होतोच याशिवाय ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायालाही प्रोत्साहन मिळण्याचे काम होते.या दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक जनजागृती करण्यात येते.शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात १ लाख उकडलेल्या अंड्यांचे मोफत वितरण करण्यात आले.यासाठी विविध कुक्कुटपालन संस्थांचे सहकार्य लाभले