..तर यांच्यात होईल विश्वचषक फायनल, गुगल सीइओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी

टीम महाराष्ट्र देशा : युएसआयबीसीचे अध्यक्ष निशा देसाई बिस्वाल यांनी सुंदर पिचाई यांना एक प्रश्न विचारला ‘तुम्हाला काय वाटतं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोण पोहचेल?’ या प्रश्नावर उत्तर देताना पिचाई यांनी एक भविष्यवाणी वर्तवली आहे.

यावर उत्तर देतांना विश्वचषक २०१९ चा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघात खेळवला जाईल, असं पिचाई यांनी युएसआयबीसीच्या इंडिया आयडियाज समीट कार्यक्रमात म्हटलं आहे .

भारतीय संघाने आतापर्यंतच्या सगळ्याच सामन्यात चांगले प्रदर्शन केले, असं म्हणत त्यांनी भारतीय संघाचे तोंडभरून कौतुकही केले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे.