वर्ल्डकप २०१९ : टीम इंडिया आज अफगाणिस्तानशी भिडणार

blank

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्डकप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अफगाणिस्तानची टीम पाहता या सामन्यात टीम इंडियाचं विजयाची प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे हक्काचे २ गुण कमावण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.

आजचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. हा सामना साऊथम्पटनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातला हा पाचवा सामना असून टीम इंडियाने मागील सामन्यांमध्ये बजावलेली कामगिरी लक्षात घेता, आजचा विजय पक्का आहे. कारण अफगाणिस्तान संघाला गेल्या पाचही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर टीम इंडिया अद्याप अपराजित आहे.

दरम्यान, भारतीय संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंची चिंता आहे. सलामीवीर शिखर धवन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पण दुखापतीमुळे काही सामने खेळू शकणार नाही त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळेल. विजय शंकरही दुखापतग्रस्त आहे त्यामुळे भारतीय संघाची चिंता अजून वाढली आहे.

संभावित भारतीय संघ

लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार ) विजय शंकर/रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी ( यष्टीरक्षक ) केदार जाधव , हार्दिक पांड्या , कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह