fbpx

वर्ल्डकप २०१९ : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा :  वर्ल्डकप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानची टीम पाहता या सामन्यात टीम इंडियाचं विजयाची प्रबळ दावेदार आहे. प्रथम फलंदाजी करत असल्याने भारतीय फलंदाज या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.

आजचा हा सामना साऊथम्पटनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातला हा पाचवा सामना असून टीम इंडियाने मागील सामन्यांमध्ये बजावलेली कामगिरी लक्षात घेता, आजचा विजय पक्का आहे. कारण अफगाणिस्तान संघाला गेल्या पाचही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर टीम इंडिया अद्याप अपराजित आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळाली आहे. तर उर्वरित संघात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ 

लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार ), विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी ( यष्टीरक्षक ) केदार जाधव , हार्दिक पांड्या , कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह