fbpx

वर्ल्ड कप २०१९ : आयसीसीच्या नियमावर दिग्गज नाराज

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सुपर ओवरमध्ये विजय मिळवत इंग्लंडने विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा फायनलमधील सलग दुसरा पराभव आहे.

आयसीसीच्या नियमानुसार सुपर ओवर टाय झाल्यानंतर कोणत्या संघाने जास्त चौकार मारले यावरून विजेता संघ घोषित करण्यात येतो. दोनही संघांनी समान धावा केल्या आहेत तरीही विजेता एकच संघ आहे त्यामुळे दिग्गज आयसीसीच्या या नियमावर नाराज असलेले पाहायला मिळत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने सर्वाधिक चौकारांच्या नियमाऐवजी दोघांना विभागून विजेतेपद देणे जास्त योग्य ठरलं असतं” अस ट्वीट केले आहे.

युवराज सिंगने “मी त्या नियमाशी सहमत नाही, पण नियम हे नियम असतात. अखेर विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंडचं अभिनंदन. न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली अस म्हणत नियमावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलचा निकाल सर्वाधिक चौकारांवरुन देण्यात आला. हा खूपच हास्यास्पद नियम आहे. तो सामना टायच असायला हवा होता. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोघेही विजेते आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच अभिनेता शहीद कपूरने जर इंग्लंडने जास्त चौकार मारले असतील, तर न्यूझीलंडने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे विजयाचा निकष चुकीचा आहे. अस ट्वीट केले आहे.