वर्ल्ड कप २०१९ : आज इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये अंतिम सामना

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आज अंतिम सामना होत आहे. हा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होत आहे. या दोनीही संघांनी अद्याप वर्ल्ड कप जिंकलेला नाही म्हणून आज जो संघ जिंकेल तो संघ इतिहास घडवणार आहे.

दोन्ही संघांनी साखळी फेरीत शानदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने टीम इंडियाला नमवत फायनल गाठली आहे. असाच खेळ सुरु ठेवून फायनल जिंकून विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत. या सामन्यात इंग्लंडकडून जेसन रॉय, जो रूट, मॉर्गन, जॉनी बेयरस्टो यांना चांगली कामगिरी करावी लागेल तर ट्रेंट बोल्ट, हेनरी, फर्गुसन यांना इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागणार आहे.

न्यूझीलंडकडून कर्णधार विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहे तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि क्रिस वोक्स यांना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागणार आहे.