वर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तानमध्ये ‘या’ तारखेला होणार महासंग्राम

मुंबई : 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. 30 मे ते 14 जुलै दरम्यान वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. या टूर्नामेंटमध्ये पहिला सामना 30 मेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या वर्षी तब्बल 10 संघ वर्ल्डकमध्ये भाग घेणार आहेत.

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रकेविरोधात साउथंप्टनच्या हँपशायरमध्ये होणार आहे. साउथेम्प्टन ( भारत, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान), बर्मिंघम (इंग्लंड आणि बांग्लादेश) आणि मॅनचेस्टर (पाकिस्तान आणि वेस्टइंडिज) यांच्यात 2-2 सामने या मैदानावर होणार आहेत. ओवलवर (ऑस्ट्रेलिया), नॉटिंघममध्ये (न्यूझीलंड) आणि लीड्स (श्रीलंका) यांचा एक सामना होणार आहे.

भारताचे सामने
5 जून : दक्षिण आफ्रिका (साउथेम्प्टन)
9 जून : ऑस्ट्रेलिया ( ओवल )
13 जून : न्यूझीलंड ( नॉटिंघम )
16 जून : पाकिस्तान (मॅनचेस्टर)
22 जून : अफगाणिस्तान (साउथेम्प्टन)
27 जून : वेस्टइंडिज (मॅनचेस्टर)
30 जून : इंग्लंड (बर्मिंघम)
2 जुलै : बांग्लादेश (बर्मिंघम)
6 जुलै : श्रीलंका (लीड्स)
9 जुलै : पहिली सेमिफाइनल (मॅनचेस्टर)
11 जुलै : दूसरी सेमीफायनल (बर्मिंघम)
14 जुलै : फायनल (लॉर्ड्स)

भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला सामना रंगणार आहे. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफी-2017 च्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारताकडे याचा बदला घेण्याची मोठी संधी आहे. 2015 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेली टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात हा वर्ल्डकप खेळणार आहे.

7 सामने डे-नाईट
संपूर्ण वर्ल्डकपमध्ये एकूण 7 सामने डे-नाईट होणार आहेत. पहिला सामना 2 जूनला ब्रिस्टलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार आहे.

मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज