वर्ल्ड कप २०१९ : आम्ही भारताला हरवणार; शाकीबची डरकाळी

टीम महाराष्ट्र देशा :  आयसीसी वर्ल्ड कपमध्ये २ जुलैला भारत आणि बांगलादेशचा सामना होणार आहे. या सामन्यात आम्ही भारताचा पराभव करणार असं विधान बांगलादेशचा अष्टपैलू शाकीब अल हसनने केले आहे. त्यामुळे या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...

या विश्वचषकात भारताने एकही सामना गमावलेला नाही याविषयी बोलताना शाकीबने ‘भारताने आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. विश्वचषकाचे ते प्रबळ दावेदार आहेत. पण आमचा संघही चांगल्या फॉर्मात आहे आणि आमच्याकडेही अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघालाही आम्ही पराभूत करू शकतो आणि यासाठी आम्ही सक्षम आहोत’. अस विधान केले आहे. शाकीबने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने ४७६ धावांसह १० विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, बांगलादेशने यापूर्वी २००७ साली झालेल्या विश्वचषकात भारताला पराभूत केले होते. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.Loading…


Loading…

Loading...