जागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश

p-v-sindhu

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू हिने चीन च्या सॅन यु हिचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू हिने सॅन यु हिचा २१-१४, २१-९ असा सहज पराभव केला. सिंधूने या स्पर्धेतील किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. सिंधूने २०१३ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. आज के. श्रीकांत च्या पराभवामुळे या स्पर्धेतील पुरुष गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले .