fbpx

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची फायनलमध्ये धडक

pv-sindhu

टीम महाराष्ट्र देशा:- भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने सेमीफायनलच्या सामन्यात चीनच्या चेन युफेईचा २१-७, २१-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.

या सामन्यात पहिल्या गेमपासूनच सिंधूनं आघाडी मिळवली होती. त्यामुळे चीनची चेन युफेई प्रचंड दबावात खेळत होती. चेनचा या एका गोष्टीचा फायदा सिंधूनं घेतला आणि ब्रेक पर्यंत ११-३ ची आघाडी मिळवली. ब्रेकनंतर चेन क्रोस कोर्ट खेळत गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे प्रयत्न सिंधूच्या खेळीसमोर फोल ठरले. सिंधूनं दमदार स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजच्या जोरावर १५ मिनिटांचा पहिला गेम २१-७ नं आपल्या नावावर केला.

दरम्यान या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने आतापर्यंत तिसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या दोन अंतिम फेऱ्यांमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये आता पाच पदके झाली आहेत. सिंधूने यापूर्वी दोन रौप्यपदकसांह दोन कांस्यपदकेही पटकावली होती. आज उपांत्य फेरीत विजय मिळवत सिंधूने रौप्य पदक निश्चित केले आहे.

महत्वाच्या बातम्या