जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : ‘सुपर सायना’ची तिसऱ्या फेरीत धडक

टीम महाराष्ट्र देशा – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने विजयी आगेकूच सुरूच ठेवली असून तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. सायनाने दुसऱ्या फेरीत आलीये डेर्मिबगचा २१-१७, २१-८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.तिसऱ्या फेरीत सायनाला इंडोनेशियाच्या रॅतचॉक इंटनॉन हिच्याशी सामना करावा लागणार आहे. दरम्यान, आज सकाळीच किदाम्बी श्रीकांतने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सायनाला प्रतिस्पर्धी अली डेमीर्बगकडून चांगलाच प्रतिकार सहन करावा लागला. पहिल्या सेटमध्ये अलीने सायनाला चांगलचं दमवलं. पहिल्या काही मिनीटांमध्ये अलीने सायनावर १-२ गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासूनच सायनाने चतुराईने काही गुणांची कमाई करत ४-५ गुणांची भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली. नेटजवळचे काही फटके खेळत सायनाने तुर्कीच्या अलीला चांगलचं दमवलं. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने ११-४ अशी भक्कम आघाडी आपल्याकडे कायम राखली होती.

सिनसिनाटी ओपन : बोपण्णा-डॉडीग जोडीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नडालची ‘अमेरिकन ओपन’च्या तिस-या फेरीत धडक