Workout Tips | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Workout Tips | टीम कृषीनामा: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस वर्कआउट करण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देत असतात. त्याचबरोबर व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. बहुतांश लोक व्यायामानंतर ज्यूस किंवा फक्त पाण्याचे सेवन करतात. मात्र, व्यायामानंतर शरीराला एनर्जीची गरज असते. त्यामुळे शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही व्यायामानंतर पुढील हेल्दी स्नॅक्स खाऊ शकतात.

अंडी (Egg-For Post Workout Snacks)

तुम्ही व्यायामानंतर अंड्याचे सेवन करू शकतात. कारण अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका अंड्यामध्ये सुमारे सहा ते आठ ग्रॅम प्रोटीन आढळून येतात. त्यामुळे व्यायामानंतर शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही अंड्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्ही उघडलेली अंडी, हाफ फ्राइड अंडी किंवा ऑम्लेट खाऊ शकतात. व्यायामानंतर अंड्याचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

काळे चणे (Black chickpeas-For Post Workout Snacks)

शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही व्यायामानंतर काळ्या चण्यांचे सेवन करू शकतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळून येतात, जे आपल्या शरीराला एनर्जी प्रदान करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही उकडलेल्या काळ्या चण्यांचे सेवन करू शकतात.

बदाम (Almonds-For Post Workout Snacks)

बदामामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, आयरन, कॅल्शियम यांचा समावेश आहे. बदामाचे सेवन केल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही व्यायामानंतर भिजवलेले किंवा साध्या बदामाचे सेवन करू शकतात.

व्यायामानंतर शरीराला एनर्जी प्रदान करण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात. त्याचबरोबर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात पुढील पदार्थांच्या समावेश करू शकतात.

मोड आलेले मूग (Deformed Mung Bean for Calcium Deficiency)

मोड आलेले मूग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर नियमित मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहून कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते.

अंजीर (Fig for Calcium Deficiency)

शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अंजिराचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अंजिरामध्ये कॅल्शियम सोबतच फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे अंजिराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि पचन संस्थाही निरोगी राहते.

आवळा (Amla for Calcium Deficiency)

आवळ्याचे सेवन केल्याने शरीरासोबतच केसांना आणि त्वचेला अनेक फायदे मिळतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम आयरन आणि ओमेगा 3 आढळून येते. आवळ्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात आणि शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश