कामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला

पुणे :लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस कंपनीतून बेकायदेशीरपणे नोकरीवरुन काढलेल्या २१ कामगारांना कामगार न्यायालयातील लढयात १६ वर्षांनी यश मिळाले आहे. या कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश दिले आहेत.

Loading...

लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस या कंपनीतील २१ कामगारांना कोणतेही कारण न देता नियमबाह्य रित्या कमी करण्यात आले होते. त्यावेळी त्या २१ कामगारांनी अॅड. संतोष म्हस्के यांच्या मार्फत कामगार न्यायालयात धाव घेतली. तब्बल १६ वर्ष खटला लढल्यावर २६ जून रोजी निकाल कामगारांच्या बाजूने लागला. दरम्यान या निकालाची प्रत आज (९ जुलै रोजी ) कामगारांना प्राप्त झाली आहे.

इतकेच नव्हे तर या २१ कामगारांना कमी केल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचे निम्मे वेतन, अनुषंगिक आर्थिक फायदे देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच कंपनी व्यवस्थापनास ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या दंडाची ५ हजार रुपये रक्कम कमी केलेल्या प्रत्येक कामगारास देण्याचा आदेशही दिला आहे.Loading…


Loading…

Loading...