‘अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करायचं आहे काम’ ; कॅन्सरग्रस्त घनश्याम नायक यांनी व्यक्त केली अखेरची इच्छा

ghanshyam naek

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याची सुरू चर्चा होती. त्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. सप्टेंबर २०२०मध्ये ७७ वर्षीय घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर त्यांची सर्जरी झाली होती. घनश्याम यांचा मुलगा विकासने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले होते. घनश्याम नायक यांच्या कुटुंबियांनी किमोथेरपी सुरू केली आहे.

दरम्यान, नट्टू काका लवकर बरे व्हावेत म्हणून चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान नट्टू काकांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. नट्टू काकांना मेकअप करूनच अखेरचा प्रवास करायचा आहे. एका कलाकाराने व्यक्त केलेली ही अखेरची इच्छा सगळ्यांचच मन हेलावणारी आहे. त्यांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP