पैठण मधील नवनाथ मंदिराच्या जलकुंभाचे काम सुरु; जुन्या जलकुंभाचे काम मात्र प्रलंबितच

औरंगाबाद : पैठण शहरातील नवनाथ मंदिर जवळच्या जलकुंभाच्या पीसीसी कामाचे शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक हसनोद्दीन कठ्यारे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरु करण्यात आले आहे. मात्र जुन्या तहसिल कार्यालया जवळील जलकुंभाचे काम देखील प्रलंबितच आहे.

कधीकाळी जागे अभावी रखडलेले जलकुंभाचे काम राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मध्यस्थीने जागेचा प्रश्न सोडवण्यात आला. जागा हस्तांतरण देखील झाली भुमीपुजनही झाले महिना उलटला काम आजही बंद आहे, ठेकेदारानुसार नव्या शासकीय दराने पैसे द्या काम सुरु करतो, तरी जिल्हाधिकारी तथा पैठण आपेगाव प्राधिकरण तथा एमजेपीने हा नव्या दराचा प्रश्न आजही न सोडवल्याने दोन मंञ्यांनी भूमीपुजन केलेले काम आजही बंदच आहे.

असाच पेच नवनाथ मंदिरा जवळील जलकुंभाच्या कामा बाबतीत निर्माण झाला होता. मात्र तो पेच आज सुटला असून या जलकुंभाच्या पायाभरणीचे (पीसीसी) काम आज नगरसेवक हसनोद्दीन कठ्यारे यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आले. या प्रसंगी एमजेपीचे सहाय्यक अभियंता उमल चांदेकर अभियंता सरोदे व ठेकेदार सुमीत गायकवाड यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या