अहमदनगरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात…

उड्डाणपुल

अहमदनगर: नगरच्या निवडणुकांतील महत्त्वाचा विषय म्हणजे उड्डाणपूल मग तो अनेक वेळा केवळ घोषणामध्ये राहिला तर अनेकदा तो केवळ कागदावर होता. मात्र आज अखेर नगरकरांची उड्डाणपूल निर्मितीची प्रतीक्षा संपली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि सोशल मीडियापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये चेष्टेचा विषय झालेल्या उड्डाणपुलाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे.

सक्कर चौक ते स्टेट बँक चौक, सक्कर चौक ते चांदणी चौक, सक्कर चौक ते थेट महापालिका मुख्यालयाच्यापुढे असे अनेकदा या पुलाचे ठिकाण सांगण्यात येत होते. मात्र आता अखेर सक्कर चौक ते जीपीओ चौक असे या कामास सुरुवात झाली आहे. सोमवारी या पुलाच्या पहिल्या कॉलम उभारण्यात आला आहे.

अनेक वर्षे लोटल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा आणि राजकीय टीकेचा झाला. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले. त्यावेळीही निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले लालूच, असे म्हणत हिणवण्यात आले. मात्र आता गेल्या महिन्यात यश आले अन् या कामास गती मिळाली. आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने नगरकरांचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल अखेर रुपास येऊ लागला आहे.

महत्वाच्या बातम्या