‘अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानाची कामे मनरेगाच्या मार्फत करा’

nilam gorhe

पुणे- महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापति डॉ.नीलम गो-हे यांनी उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला.याबाबत लवकर ताबडतोबीची मदत फार गरजेची आहे.ज्या ठिकाणी घरात पाणी गेलेले आहे आशा पुणे,कोल्हापूर आणि इतर ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे तेथे तयार जेवणाची मदत देण्यात यावी.पंचनामे तात्काळ करून पाऊस ओसरल्यानंतर देखील पंचनामे सुरू ठेवून बळीराजाला ,नागरिकांना जेव्हडी जास्त मदत करता येईल असे डॉ.गो-हे यांनी सुचवले.

त्याचबरोबर पुणे येथील आपत्कालीन सेवेचा जो नंबर आहे तो डॉ.गो-हे यांची बहीण जेहलम जोशी यांनी शिवाजीनगर नाल्यात मोठयाप्रमाणात पाणी वाढते आहे किंवा काय याबाबत चौकशी करण्यासाठी फोन लावला असता त्यांनी ऐकूण घेतले व फोन डिसकनेक्ट झाला,नंतर कोणताच प्रतिसाद आला नाही व क्रमांक बिझी आवाज आला.एकूण पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापनाची बेफिकिरी याबद्दल डॉ.गो-हे यांनी  पवार यांच्याकडे तक्रार करून यात सुधारणा करण्याची सूचना केली.

मनरेगा अंतर्गत ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कामे करण्याची सूचना डॉ.गो-हे यांनी मा.ना.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.मागील वर्षी सांगली कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानाची कामे मनरेगाच्या अंतर्गत केल्याने शेतकर्यांचा मोठा फायदा झाला होता असे देखील गो-हे यांनी संगितले.याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करण्याची विनंती केली.

महत्वाच्या बातम्या-