पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला. म्हणाले, सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे मोजून वापरले पाहिजेत.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केल्याची पाहायला मिळते.
त्यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांना सल्ला दिला. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सुड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –