fbpx

थंडीची चाहूल लागताच लोकरीचे कपडे महागले

औरंगाबाद: शहरात थंडीची चाहूल लागताच लोकरीच्या कपड्यांनी अनेक दुकानांची दालने साजली आहेत. तर तिबेटियन दुकानदारांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दुकाने थाटली आहेत. टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्‍ली आणि कुंभारवाडा येथील दुकानातही या कपड्यांना मागणी वाढली आहे. औरंगाबादच्या कापड व्यावसायिकांनी पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्‍ली येथून लोकर व लोकरीचे कपडे मागवले आहेत. यंदा जीएसटीमुळे सरासरी १५ ते २० टक्क्यांनी लोकरीच्या कपडे दरात वाढ झाली आहे.हिंदुस्थान समाचार