वाट्टेल ते झालं तरी आता कॉंग्रेससोबत युती करणार नाही : मायावती

टीम महाराष्ट्र देशा- काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असं बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना मायावती यांनी म्हटलं आहे की, ‘मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही’.‘राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन्हीकडे आम्ही एकतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करु अन्यथा स्वतंत्र लढू. पण काँग्रेससोबत जाणार नाही’, असं मायावती पत्रकार परिषदेदरम्यान
स्पष्ट केलं.

मायावतींच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • भाजपाचा पराभव करणे हा काँग्रेसचा हेतू नसून आपल्या मित्र पक्षांना दुखावणे हा मुख्य हेतू आहे.
  • काँग्रेस भाजपाचा नाही तर आपल्या मित्रांचा पराभव करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • काँग्रेसचा अहंकार बोलत असून त्यांना आपण एकटे भाजपाचा पराभव करु असं वाटत आहे.
  • सत्य हे आहे की सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचारासाठी लोक त्यांना अजूनही माफ करायला तयार नाहीत.
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा काँग्रेस-बसपा युतीसाठी हेतू चांगला आहे. मात्र काँग्रेस पक्षातीलच काही नेते यामध्ये अडथळा आणत आहेत. ‘काँग्रेस पक्षात दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांची काँग्रेस-बसपा युती होऊ नये अशी इच्छा आहे.
  • भाजपाचे एजंट असणारे दिग्विजय सिंह सांगत आहेत की, मायावती यांच्यावर केंद्रातून दबाव असल्याने त्यांना युती करायची नाही आहे. मात्र हा आरोप निराधार आहे .