fbpx

राज्यात मतदार नोंदणीत महिलांची आघाडी ,४ कोटी १६ लाख महिला मतदार

नवी दिल्ली : मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकारउल्लेखनीय असून राज्यातील ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार प्रथमचमतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदार आघाडीवर आहेत. राज्यातीलपुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागेनोंदणीकृत ९११ महिला मतदार असे आहे. राज्यातएकूण ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ५७ लाख १ हजार ८७७ पुरुष तर ४ कोटी १६ लाख २५ हजार ९५० महिला मतदार आहेत.राज्यात २ हजार ८३ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत.

एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे.राज्यात एक हजार लोकसंख्येमागे ७१० नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यातएकूण ४८ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात एकूण ९५ हजार ४७५ मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आलीआहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव १७ व्यालोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झालेआहेत. महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ७३ लाख २९ हजार९१० आहे. राज्यात १८ ते १९ वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदारम्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या ११ लाख ९९ हजार ५२७ आहे. हे तरुणप्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.देशात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६४ हजार ८२४ आहे.

देशात ८९ कोटी ८७ लाख मतदार
देशातील २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजमितीसएकूण ८९ कोटी ८७ लाख ६८ हजार ९७८ मतदार आहेत.यामध्ये ४६ कोटी ७० लाख ४ हजार ८६१ पुरुष मतदार आहेत तर४३ कोटी १६ लाख ८९ हजार ७२५ महिला मतदार आहेत.देशभरात ३१ हजार २९२ तृतीयपंथी मतदार आहेत.