महिला आघाडीच्या कार्यक्रमात पुरुषांची नावे घेत नाही – मनीषा कायंदे

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शिवसेनेने महिलांसाठी पैठणी प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रस्ताविकानंतर आयोजकांनी आमदार मनीषा कायंदे यांना भाषणासाठी बोलालवले. सुरुवातीला त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांची नावे घेतली. मात्र पुरुषांची नावे घेण्याची वेळ येताच त्यांनी महिला आघाडीच्या कार्यक्रमात पुरुषांची नावे घेत नाही असा टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम शिवसेनेतर्फे घेण्यात आले. तापडिया नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात प्रशिक्षण देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. काही महिला सैनिकांना त्यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून स्वयंरोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पुन्हा पुरुषांचा धागा धरत विशाखा राऊत यांनी नाट्यगृहतील पुरुषांची संख्या बघत त्यांनी ३३ टक्के उपस्थिती पाहून उपस्थितांची नावे घेण्याचे टाळले. त्यामुळे शहरात मोठमोठ्या पद भूषवलेल्या काही नेत्यांना या महिला नेत्यांचे बोलणे चांगलेच लागले. कार्यक्रम संपे पर्यंत उपस्थित पुरुष मंडळींनी आपले नाव कोणी उच्चारावे अशी अशाच सोडून दिली.

महत्त्वाच्या बातम्या