fbpx

‘महिला सशक्तीकरण गरजेचे , एका पंखाद्वारे चिमणी उडाण भरू शकत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. तर, पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. २०२२ म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी मिळेल, ज्यांना कनेक्शन घेण्याची इच्छा नाही त्यांना यातून वगळलं जाणार आहे.

Budget 2019 live updates :

– यावर्षी नवीन ४ दुतावास उघडण्याची योजना

– एसएचजीच्या प्रत्येक महिलेला ५ हजारांचा ओव्हरड्राफ्ट

– भारतीय पासपोर्ट असणाऱ्या एनआरआयंना आधारकार्ड मिळणार

– महिला सशक्तीकरण गरजेचे आहे. कारण, एका पंखाद्वारे चिमणी उडाण भरू शकत नाही.

– ‘नारी से नारायणी’ हाच सरकारचा नारा- महिलांची परिस्थिती सुधारली नाहीतर विकास शक्य नाही

– एलईडी बल्बमुळे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झाली

– उजाला योजनेद्वारे ३५ कोटी एलईडी बल्बचे वितरण – स्टार्टअपसाठी दुरदर्शन चॅनेल

– सरकार श्रम कायद्यात दुरुस्ती करणार

– खेलो इंडिया योजनेचा विस्तार होणार

– ५ वर्षात ९ कोटी ६० लाख शौचालयांची निर्मिती

– ९५ टक्के शहरे उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त झाले

– उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यास वाव

– जगातील पहिल्या २०० शिक्षण संस्थांमध्ये ३ भारतीय शिक्षण संस्था